Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीशासकीय योजनांची जत्रा
spot_img

शासकीय योजनांची जत्रा

माझी वसुंधरा अभियान
चामोर्शी – नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत स्वच्छताही सेवा, स्वच्छता पंधरवाडा तसेच माझी वसुंधरा अभियान ‘ मेरी माटी मेरा देश अमृत कलश अंतर्गत सांस्कृतिक भवन येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी शासकीय योजनांचा जागर लावण्यात येऊन नागरिकांना शासनाचा योजनांचा लाभ घेता यावा याकरिता शासकीय योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल लावण्यात येऊन नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन कामगार योजनेअंतर्गत १८लाभार्थ्यांना पेटीचे वाटप करण्यात आले तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत दोन मुली असणाऱ्या ४मातांना प्रत्येकी २५ हजार रुपयाचे रोखे वितरित करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनआ .डॉ . देवराव होळी ,अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री पंकज वायलालवार, प्रमुखअतिथी म्हणून उपाध्यक्ष लोमेश बुरांडे ,सभापती गीताताई सोरते ,उपसभापती स्नेहा सातपुते ,नगरसेवीका प्रेमा आईचवार ,वर्षा भिवापूरे ‘नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, श्रीकांत फागणेकर, तहसीलदार प्रशांत घोरुडे . ,संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील ,प्रभारी सि डी पी ओ गजानन भांडेकर , कर निरीक्षक भारत वासेकर , स्वच्छता कोआरडीनेटर अलकेश बनसोड आदी उपस्थित होते .
नगरपंचायत तर्फे शासकीय योजनांच्या मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ,पीएम स्वनिधी योजना ,दिव्यांग कल्याण योजना ,वैयक्तिक स्वच्छालय,ओम गृह उद्योग मिरची पावडर कान्हाळगाव ,टमाटर आचार गृह उद्योग आंबोली ग्रामीण रुग्णालय चामोर्शी अंतर्गत आरोग्य विषयक माहिती देणारे व तपासणी होणारे स्टॉल लावण्यात आलेतालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत आरोग्य विषयक तपासणी स्टॉल लावण्यात आले यामध्ये आयुष्यमान भव कार्ड २८३आबा कार्ड २९१ , आदिवासीमातृत्व अनुदान योजना ,आरोग्य तपासणी बीपी १७२रुग्ण शुगर १८६ रुग्णची तपासणी करण्यात आली बांधकाम कामगार नोंदणी कार्ड वाटप व पेटी वाटप सरकारी कामगार अधिकारी अंतर्गत लाभार्थ्यांना कामगार पेटीचे वाटपही यावेळी करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश नाईक , संचालन अधिक्षक मोरेश्वर पेदाम तर आभार विजय पेद्दीवार यांनी पार पाडले .
कार्यक्रमा करिता ग्रामिण रुग्णालय येथील डॉ. कांचन बलमवार , डॉ. जस्मीना टेंभूर्णे , पुरुषोत्तम घ्यार , राजेंद्र अल्लीवार , तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सत्यवान सोरते , एस.एम . कांबळे , एम एम . डायकी , राहुल पाल , स्नेहा गायकवाड अतुल कांबळे ,न.प.कर्मचारी दिलीप लाडे , रमेश धोडरे , विजय पेद्दीवार , प्रभाकर कोसरे , श्रीकांत नैताम , बाळा धोडरे , संतोष भांडेकर , रितीक खंडाळे , राकेश कोत्तावार , स्नेहल भुरसे , सोनी पिपरे ,सुभाष कनकुटलावार , रमेश कनकुटलावार ,स्वच्छता पर्यवेक्षक रुषी गोरडवार , अशोक नवले यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले .
कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी ,सरकारी कामगार कार्यालयाचे कर्मचारी ,अंगणवाडी सेविका ,बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page