Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा
spot_img

देवतळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

चामोर्शी:- स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.डी.जी.म्हाशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ सप्टेंबर ला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.डॉ.राजेंद्र झाडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागा संबंधित माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.आर. डी बावणे यांनी अध्यक्षीय भाषणातून रा.से.यो.विभागाचे महत्त्व व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल कुळयेटी या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार रा.से. यो. सह-कार्यक्रम अधिकारी प्रा.वंदना थुटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रा.से. यो. सह-कार्यक्रम अधिकारी प्रा.संकेत राऊत तसेच रा.से.यो.स्वयंसेवक महेश कोलेटी ,शुभम नरोटे, शरद झुरे, सुनील मट्टामी ,रोशन पदा यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page