Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी अपघातातील मृतकांच्या परिवारास सुरजागड कंपनीने आर्थिक मदत द्यावी--आमदार डॉक्टर देवराव होळी...
spot_img

चामोर्शी अपघातातील मृतकांच्या परिवारास सुरजागड कंपनीने आर्थिक मदत द्यावी–आमदार डॉक्टर देवराव होळी यांची मागणी

जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च कंपनीने करावा

मार्कंडा देव येथील मृतकाच्या परिवारातील सदस्यांची भेट घेवून केले त्यांचे सांत्वन के

चामोर्शी:-काही दिवसांपूर्वीच घरातील सदस्य मरण पावल्याने शासनाच्या निराधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या मार्कडादेव येथील जंधलवार परिवारातील भावना नरेश जंधलवार, प्रियंका गणेश जंधलवार, रुद्र गणेश जंधलवार यांचे दिनांक २५ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथे सुरजागड कंपनीच्या माल वाहतूक ट्रकच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. त्यामुळे सुरजागड कंपनीने माणुसकीचा धर्म जोपासीत या अपघातात मृतक झालेल्या परिवारातील सदस्यांना आर्थिक मदत तर जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचाराचा खर्च करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून लहान व मोठ्या दोन्हीही वाहनांनी वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार महोदयानी मृतकाच्या परिवारातील सदस्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदतही केली.

यावेळी दिलीपजी चलाख, सरपंच मोगरेताई, भुजंग आभारे, राजूभाऊ मोगरे तथा मृतक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page