Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीकर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात अमृत कलश संकलन
spot_img

कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात अमृत कलश संकलन


चामोर्शी:- कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.म्हाशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोज बुधवार ला “मेरी माटी मेरा देश” उपक्रमा अंतर्गत “अमृतकलश” संकलन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर वर्ग यांनी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. अमृतकलश ला वंदन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सपूर्त प्रतिसाद दिला, या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून selfiwithmerimati.in या पोर्टलवर सेल्फी अपलोड केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.डी.बावणे, प्रा.डॉ. राजेंद्र झाडे,डॉ. भूषण आंबेकर, प्रा.दीपक बाबनवाडे,प्रा.वंदना थुटे,प्रा.संकेत एस. राऊत, प्रा. अरुण कोडपे, प्रा. वैशाली कावळे, प्रा. स्नेहा उसेंडी, प्रा.वैभव म्हस्के, प्रा.रोशन गेडाम, श्री.मिलिंद म्हाशाखेत्री, श्री.आनंदराव दिवटे,श्री.सचिन भरडे, श्री. चंद्रपाल राठोड, श्री विक्की बारसागडे,श्री निलेश कुंनघाडकर, उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page