Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीअपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची डॉ उसेंडी यांची संत्वन भेट
spot_img

अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची डॉ उसेंडी यांची संत्वन भेट


आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन
चामोर्शी:-
मार्कंडा देव येथील अपघातील मृतकाच्या परिवारातील सदस्यांची माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन करत सूरजागड लायल मेटल कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
चामोर्शी शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्या मार्कडादेव येथील जनड्यालवार परिवारातील तीन जनाचा मृत्यू झाला त्यांच्या परिवारातील सदस्याची २६ सप्टेंबर रोजी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सात्वन पर भेट घेतली त्यावेळी मृतकाच्या नातेवाइकांना सूरजागड लायल मेंटल कंपनी च्या व्यवसथापक सोबत चर्चा करून आर्थिक मदत व गंभीर जखमी असलेल्या नरेंद्रसाठी रुग्णालयाचा खर्च मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगत कोनसरी येथील कंपनीत नोकरी साठी ही प्रयत्न करणार असून दरम्यान गडचिरोली सामान्य रुग्णालयात अपघातात जखमी झालेला नरेंद्र जांध्यालवार यांचीही भेट घेत तब्बेत गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्याची सूचना सामान्य रुग्णालय अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, सुरेश. बंडावार , अमर मोगरे, नंदुजी रायसिडाम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page