Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीसालेभट्टी जवळ दोन ट्रक फसल्याने धानोरा ते मुरुमगाव मार्गाची वाहतूक बंद
spot_img

सालेभट्टी जवळ दोन ट्रक फसल्याने धानोरा ते मुरुमगाव मार्गाची वाहतूक बंद


राष्ट्रीय महामार्ग खड्यात , अपघात ताचा सिलसिला सुरूच
धानोरा तालुका प्रतिनिधी:-मागिल हप्त्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली.या महामार्गाला मोठ्ये खड्डे पडल्याने अपघाचे प्रमाण वाढले त्यासोबतच काल एक ट्रक सकाळी फसले तर रात्री दोन ट्रक फसल्याने ये-जा करायला जागाच शिल्लक नसल्याने गडचिरोली मुरुमगाव हा राष्ट्रीय महामार्ग रात्री पासुन बंद पडल्याने ट्रकाचि लाईन लागलि असुन वाहतुक कोंडी निर्माण झालेली आहे. धानोरा ते मुरूमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३०असुन हाच रस्ता पुढे छत्तीसगढ राज्याला जावुन मिळतो.त्यामुळे सुरजागड लोह खनिज घेऊन जाणारे शेकडो ट्रक,बस यासोबतच चार चाकी दोन चाकी वाहनांची वर्दळ असते.दिवस रात्री हा रस्ता चालतो.नेमका या रोडवर मुसळधार पडलेल्या पावसामुळे सालेभट्टी या गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले.याच खड्ड्यात काल सकाळी येथिल खड्ड्यात CG 08AV 8883 या क्रमांकचा छत्तीसगड ला जाणारा ट्रक काल सोमवार ला फसला होता. सोमवार च्या रात्री 8.00 वाजता त्याचं ठिकाणी मिनी ट्रक पलटी झाली तिला रात्रीच काढली नंतर रात्री दहा वाजता छत्तीसगड वरून येणारे ट्रक क्रमांक CG 08AM9443 हा ट्रक काढत असताना त्याचं खड्यात फसला तर थोड्या वेळाने छत्तीसगड मार्गाने येणारा ट्रक क्रमांक CG04LR0779 हा ट्रक निलगिरी चे लाकडे घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी काढतानी तोही फसला त्यामुळे सकाळ चि गडचिरोली वरून येणारी बस मुरूम गाव ला न जाता तिथूनच वापस गेली रस्ता बंदचा फटका बसला सुद्धा बसला आहे त्यामुळे सकाळी येणारे शाळेचे व कॉलेज चे विद्यार्थी यांची शाळा सुटली.तर कार्यालयात काम करणार्या कारकुनाना ही याचा फटका बसला. रात्री पासून रस्ता धानोरा मुरूमगाव रस्ता बंद आहे.वाहतुक कोंडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतर वाहनांना जपतलाई मोहली मार्गाचा जास्त फेरा करून पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांना करावा लागत आहे. दोन ट्रक फसल्याने ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक रात्री पासून बंद झाली आहे . काल आपली वाहने काढण्यासाठी रस्त्याची मरम्मत करून आपली वाहने काढले पण आज मंगळवार ला रास्तच बंद झाला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे कि पाण्याचा हौदोस असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.संबधित विभागाने मात्र अजून पर्यंत या राष्ट्रीय महामार्गनी दखल घेतली नाही. अपघात होऊन कोणाचा जीव गेल्यावर च जाग येईल का ? त्यामुळे वाहन धारकांकडून व नागरिकां कडून रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा अन्यथा रस्त्याच बंद करू असे समस्त सालेभटी व धानोरा परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page