Saturday, February 24, 2024
Homeएक्सीडेंटट्रक, मोटार सायकल अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालय...
spot_img

ट्रक, मोटार सायकल अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू व एक गंभीर जखमी———————- ट्रक चालक फरार


चामोर्शी :- सूरजागड येथून लोहखनिज घेऊन येणारा ट्रक चामोर्शी वरून गडचिरोली मार्गे जात असताना नवीन तहसील कडून येणाऱ्या मोटासायकलस्वार यांची तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या वळणा जवळ २५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३०. दरम्यान सामोरा समोर जब्बर धडक झाल्याने चार मोटासायकलस्वार ट्रक मध्ये आले त्यामुळे
जवळपास चार पाच फूट फरफटत नेल्याने त्यात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले
मार्कंडा देव येथील नरेंद्र जंनध्यालवार, भावना नरेंद्र जनध्यालवार, प्रियंका गणेश जंनध्यालवार, रूद्र गणेश. जंनद्यालवार , हे चार जण आपल्या दुचाकी वाहन क्र.MH ३३K ३१३५ ने तहसील कार्यालय येथे कामानिमित्त आले होते काम आटोपून आपल्या गावाकडे निघाले असता तहसील कार्यालय जवळ मुख्य हायवे रस्त्यावरील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक न.C G – ०८ -AU ९०४५ ने दुचाकी स्वरास आमने सामने धडक झाल्याने गाडी सह चार जण चिरडून फर्फडत नेले त्यात चारजण गाडीसह ट्रकच्या आत मध्ये सापडून त्यात मृत्यक भावना नरेंद्र जंनद्यालवार वय ४५ वर्ष, व रूद्र गणेश जंनध्यालवार वय ०५ वर्ष हे दोघे दोघेही घटना स्थळी मृत्यू झाले. तर यातील नरेंद्र. जंनध्यालवार वय ५२ वर्ष , प्रियंका गणेश जंनध्यालावर वय २४वर्ष हे दोघे गंभीर असल्याने याना चामोर्शी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून यातील प्रियंका जंनध्यालवार त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध चामोर्शी पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी घेत आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page