Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरगणेश उत्सव सेवा प्रकल्पात आदर्श शाळेच्या स्काऊट-गाईड्स व राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थ्यांनी...
spot_img

गणेश उत्सव सेवा प्रकल्पात आदर्श शाळेच्या स्काऊट-गाईड्स व राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थ्यांनी घेतला सहभाग

  • मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी साधला विध्यार्थ्यांशी संवाद.

राजुरा 25 सप्टेंबर:-
चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने व सामाजिक वनीकरण अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सव सेवा प्रकल्प राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट युनिट लीडर बादल बेले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. यावेळी राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुरज जाधव ,प्रशासकीय अधिकारी तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्याधिकारी डॉ. जाधव म्हणाले पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून निर्माल्य संकलन करावे तसेच नगर परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणेशाचे विसर्जन करून सहकार्य करावे याकरिता विध्यार्थ्यांनी आपआपल्या परिसरातील नागरिकांनी याविषयी माहिती देऊन प्रत्येकांनी पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी विध्यार्थ्यांना निर्माल्य संकलन कार्य, दर्शनासाठी भक्तांना रांगेत लावण्यासाठी मदत करणे, सफाई श्रमदान मोहीम व प्रसाद वितरणात मदत, नागरिकांना प्रथमोपचार माहिती यासह इतरही सेवाकार्य विषयी माहिती बादल बेले यांनी दिली. यावेळी स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे, सहायक शिक्षक विकास बावणे, जयश्री धोटे, भाग्यश्री क्षीरसागर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशतेकरिता राष्ट्रीय हरित सेना विभागातील व स्काऊट गाईड च्या विध्यार्थ्यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page