Saturday, February 24, 2024
Homeगडचिरोलीगडचिरोली ते मुरुमगाव बस पंचर झाल्याने प्रवाशांची गैरसोय
spot_img

गडचिरोली ते मुरुमगाव बस पंचर झाल्याने प्रवाशांची गैरसोय

धानोरा तालुका प्रतिनिधी:-
गडचिरोली आगाराची बस क्रमांकMH-40N 8950 ची बस दिनांक 24/92023ला दुपारी 1.00 गडचिरोली येथुन सुटलि आणि लेखा गावाजवळ येवुन पंचर झाल्याने बस मंधिल प्रवासी त्रस्त झाले.यामुळे बसमधिल प्रवाशांची गैरसोय झाली.एस टि.महामंडळाच्या भंगार बसने नेहमीच प्रवाशांचे हाल होतांना दिसतात.

गडचिरोली आगाराची गडचिरोली ते मुरुम गाव बस दुपारी 1.00वाजता सुटल्यानंतर लेखा गावाजवळ येवून पंचर झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.सध्या बसचे पंचर होने,टपर उडने, पाणी गळणे असे सर्रास प्रकार पहायला मिळते.त्यामुळे बसने प्रवास किती सुखदायक आहे हे लोकांना पटायला लागले.प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असताना आगार वाल्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे भंगार अवस्थेत आहे. अशा भंगार बसेसचा प्रवाशांना होनारा त्रास थांबविण्यात यावे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page