Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी येथील गावतलाव स्वच्छता मोहीम--------------------------चामोर्शी नगरपंचायतचा उपक्रम
spot_img

चामोर्शी येथील गावतलाव स्वच्छता मोहीम————————–चामोर्शी नगरपंचायतचा उपक्रम


चामोर्शी – नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत स्वच्छताही सेवा, स्वच्छता पंधरवाडा तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गाव तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीममध्ये गाव तलाव वरील जमा झालेले कचरा सफाईचे कामे हाती घेण्यात आलेली असल्याने आज दिनांक २३ सप्टेबर रोज शनिवारला अध्यक्षा जयश्री पंकज वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत आंनदराव बुरांडे तसेच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, श्रीकांत शरद फागणेकर, स्वच्छता कोआरडीनेट अलकेश बनसोड , कर्मचारी दिलीप लाडे , सुभाष कनकुटलावार स्वच्छता पर्यवेक्षक रुषी गोरडवार , नगर पंचायतीचे कर्मचारी व स्थानिक नागरीकांनी मिळुन गाव तलाव स्व्च्छता मोहीमामध्ये सहभागी होऊन गाव तलावातील गाळ साफ करण्यात आली, सदर गाळ ट्रॅक्टरव्दारे ओला कचरा व इतर कचरा प्रक्रीया केंद्रावर खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आला. तसेच सदर गाव तलाव साफ करण्याची मोहीम दिनांक २९ सप्टेबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये नगर पंचायतीचे अध्यक्ष, उपध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका , मुख्याधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरीक सहभागी राहणार.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page