Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरसोंडो येथील देश सेवेत रुजू झालेल्या युवकाचा जल्लोषात सत्कार
spot_img

सोंडो येथील देश सेवेत रुजू झालेल्या युवकाचा जल्लोषात सत्कार

  • सोंडो येथील सरपंच जयपाल आत्राम यांनी लोकेश चे कले सत्कार.

राजुरा 22 सप्टेंबर:-

सोंडो येथील लोकेश मारोती वडस्कर या युवकाची नुकताच मिल्ट्री मध्ये नियुक्ती झाली असून ही बाब गावकऱ्यांच्या अभिमानाची असल्याचे मत सोंडो येथील सरपंच जयपाल आत्राम यांनी व्यक्त करत लोकेश चे जल्लोषात मिरवणुक काढून सत्कार केले. लोकेश अत्यंत हालकीच्या परिस्तीत आपले शिक्षण पूर्ण करून जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन केले असल्याने यातून गावातील युवकांना प्रेरणा मिळेल असेही सरपंच यांनी सत्कार करतांना आपले मनोगत व्यक्त केले.
लोकेश यांचे सत्कार व मिरवणूक काढण्यासाठी गावातील युवकांनी रीतसर पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन परवानगी काढली हे विशेष यावेळी प्रामुख्याने सरपंच जयपाल आत्राम, उपसरपंच रामराव वडस्कर शाळा समितीचे अध्यक्ष योगेश वडस्कर, पदाधिकारी,सुरेश गंदफाडे, तंटामुक्ती अध्यक्ष, शितल वडस्कर, मंगेश वडस्कर, श्रीकांत सोनूरले, प्रभाकर कोवे, मोरेश्वर कौरासे,अजहर सय्यद, मोहन वांडरे, संदीप परचाके, हर्षल आरके, राजू कष्टी, राहुल पांडव,प्रज्वल वडस्कर, सुरेश तगलवार,व्यंकटेश निलावार, अंकुश वांडरे, इत्यादी मान्यवर पस्थित राहून लोकेश ला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page