Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरपोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड.
spot_img

पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड.

बल्लारपूर (ता. प्र) 20 सप्टेंबर
( मयूर खेरकर ता. प्र.)

             पोदार इंटरनॅशनल स्कुल बल्लारपूर येथील विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कराटे या खेळातील १४ वर्ष वयोगटातून बल्लारपूर तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत

मास्टर नैतिक पायघन यांनी 35 किलो वजन गटात पहिला क्रमांक पटकविला असून या विध्यार्थीची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा क्रीडा व शिक्षण संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे आयोजित होती. पोदार इंटरनॅशनल स्कुल येथील विध्यार्थीच्या सर्वांगीन विकासासाठी ही शाळा सातत्याने विविध खेळाचे प्रशिक्षण देत असते. या शाळेत विध्यार्थीच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व बौद्धिक विकास करण्यासाठी क्रीडा शिक्षक मयूर खेरकर यांच्या माध्यमातून शाळेचे प्राचार्य व इतर शिक्षक हे नेहमीच प्रयत्नरत असतात.
विद्यार्थ्याच्या या कामगिरी व यशाबद्दल शाळेचे प्राचार्य डॉ. राकेश रंजन, प्रशासनिक व्यवस्थापक शरद करोले, क्रीडा शिक्षक मयूर खेरकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page