Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरक्रिडा स्पर्धेत विभागस्तरावर निवड झालेल्या स्टेला मॉरीस शाळेच्या विद्यार्थीनींचा माजी आमदार सुदर्शन...
spot_img

क्रिडा स्पर्धेत विभागस्तरावर निवड झालेल्या स्टेला मॉरीस शाळेच्या विद्यार्थीनींचा माजी आमदार सुदर्शन निमकरांच्या हस्ते सत्कार….

राजुरा तालुका प्रतिनिधी:-शालेय क्रिडा स्पर्धेत जिल्हास्तरावर विजय मिळवून विभागस्तरावर निवड झालेल्या राजुरा तालुक्यातील स्टेला मारीस शाळेच्या विद्यार्थीनी मुग्धा मुसळे व जानवी चापले यांचा (दि.२० सप्टेंबर) रोजी शाळेत जाऊन राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सत्कार केला.

स्टेला मारीस शाळेची विद्यार्थीनी मुग्धा नितिन मुसळे हीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या ५० मिटर फ्रिस्टाईलगटात द्वितीय क्रमांक प्राप्त करीत विभागस्तराव पोहचली तर जानवी रामनरतन चापले हिने भरड धान्य एक उत्कृष्ठ आहार या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करीत विभागस्तरावर निवड झाल्या बद्दल राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शाळेत जाऊन या दोन्ही विद्यार्थीनीचा सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतिश घोटे, भाजयुमो अध्यक्ष सचिन शेंडे, चुनाळा चे सरपंच बाळु वडस्कर, खामोना चे सरपंच तथा भाजप जिल्हा सचिव हरीदास झाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती संजय पावडे, सास्ती चे माजी ग्रा.पं. सदस्य राजकुमार भोगा, नितिन मुसळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अल्फी, सिस्टर प्रभा, सिस्टर दर्शना, शिक्षिका रितू ठाकुर, शितल उपगन्लावार, योगीता पुणेकर, पुर्वा देशमुख, भार्गवी कोडाली, कोमली चेनुपत्ती, अर्चना तलारी, मोना नगराळे, मेरी नॅरीस, संगीता सिडाम सह शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page