Sunday, February 25, 2024
spot_img

ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयाचा पियुष ताडे कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर

राजुरा तालुका प्रतिनिधी:-ॲड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड.यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा येथील पियुष पांडुरंग ताडे या विद्यार्थ्याची 19वर्षे खालील वयोगटातून विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याने तालुका व जिल्हा स्तरावर कॅरम स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला.

निवड झालेले विद्यार्थी

जिल्हास्तरावर निवड झालेल्या पाच खेळाडूंपैकी पियुषने प्रथम क्रमांकावर भरारी घेऊन महाविद्यालयाची मान उंचावली विशेष म्हणजे कबड्डीचा मुलांचा व मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, उपाध्यक्ष ॲड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, संस्थेचे सदस्य मोहन धोटे, महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षिका प्रा.मनिषा राखुंडे,जेष्ठ प्राध्यापक डॉ. दिनेश दुर्योधन, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अल्पना कवाडे, प्रा.इर्शाद शेख,प्रा.रेणुका देशकर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंना अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page