Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीरांगि येथे वाघाच्या हल्यात बैल ठार--------------------------------परिसरात वाघाची दहशत
spot_img

रांगि येथे वाघाच्या हल्यात बैल ठार——————————–परिसरात वाघाची दहशतधानोरा तालुका प्रतिनिधी:- धानोरा तालुक्यातील रांगि येथे दि.15/9/2023 रोज शुक्रवार ला शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्यात बैल ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
नियतक्षेत्रातील उत्तर रांगी कक्ष क्रमांक 441 परिसराला लागून असलेल्या शेत शिवारात गणपत नागोजी कुमरे वय अंदाजे 55 वर्ष यांचे बैल चरत असताना अचानक वाघाने बैलावर हल्ला केला. या वाघाच्या हल्यात बैल ठार मारले गेले.यामुळे पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.शेतकामाकरिता बैलांची नितांत गरज असते.बैला शिवाय कोणतेही काम करणे शक्य नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे श्री. एस. आर.रामगुंडावर क्षेत्र सहाय्यक रांगी, कु. टी.व्ही. कुमरे, वनरक्षक , एम. एन. कोहडे वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांनि घटना स्थळ गाठून मौका पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झालेलि आहे.वाघ मोठा असून तो वयस्कर असल्याचे कळते त्यामुळे जगल परिसरात कोणत्याही व्यक्तीने एकटं भटकु नये असे आव्हान वनविभागाने जनतेला केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page