Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरबैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण-----------------------देवराव भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख; बैलजोडी मालकाला...
spot_img

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण———————–देवराव भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख; बैलजोडी मालकाला भेटवस्तू देत दिल्या शुभेच्छा

राजुरा :- भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैलाचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जात असल्याचे मत राजुरा येथिल श्री हनुमान देवस्थान समितीच्या वतीने आयोजित हनुमान मंदिराच्या परिसरात बैल पोळ्यात भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना व्यक्त केले. यावेळी प्रत्येक बैलजोडी मालकांना भेट वस्तू सुद्धा देण्यात आली.

राजुरा शहरात दरवर्षी जुना बसस्थान जवळील हनुमान मंदिराच्या परिसरात शेतकरी आपल्या बैलजोड्या सजवून पोळा भरवित असतो. आधुनिकीकरणात दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत चालली आहे. असे असतांना सुद्धा बैल पोळा या सणाचे महत्त्व तेवढेच वाढले आहे. यामुळे पोळा या सनाला विशेष महत्त्व असून सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सन साजरा करीत आहे. यावेळी देवराव भोंगळे यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व राजुरा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने बैल पोळ्यात सहभागी प्रत्येक शेतकऱ्यांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सतिश धोटे, जेष्ठ नेते अरूण मस्की, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, विलास बोनगीरवार, आरपीआयचे नेते सिद्धार्थ पथाडे, संजय उपग्नलावार, सुरेश रागीट, सोमेश्वर आईटलावर, मिलिंद देशकर, महादेव तपासे, सचिनसिंह बैस, विनोद नरेन्दुलवार, सिनू पांजा, माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जयपुरकर, प्रितीताई रेकलवार, शितलताई वाटेकर, नितिन वासाडे, महेश रेगुंडवार, सचिन भोयर, मोहन कलेगुरवार, दिपक झाडे आदींसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page