Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरस्टेलॉ मॉरीस कान्व्हेंटची विद्यार्थीनी मुग्धा मुसळे ची जलतरण स्पर्धेत विभागस्तरावर निवड
spot_img

स्टेलॉ मॉरीस कान्व्हेंटची विद्यार्थीनी मुग्धा मुसळे ची जलतरण स्पर्धेत विभागस्तरावर निवड

राजुरा – जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रिडा स्पर्धेत बामनवाडा-राजुरा येथील स्टेलॉ मॉरीस शाळेची विद्यार्थीनी मुग्धा मुसळे हीने जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय मिळविला असून तीची विभागस्तरावर निवड करण्यात आली आहे.

क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रिडा परिषदेच्या वतीने बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलात सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत राजुरा तालुक्यातील स्टेलॉ मॉरीस कान्वहेंटची इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी मुग्धा नितिन मुसळे हीने 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटातील 50 मिटर फ्रिस्टाईल जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून तीची विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातून जिल्हास्तरावर जाणारी ती एकमेव स्पर्धक होती. तीच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर अॅल्फी डिएम, सिस्टर प्रभा डिएम, क्रिडा शिक्षीका भार्गवी कोडाली, भास्कर फरकाडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page