Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरसरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
spot_img

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, उपाध्यक्ष, माजी आमदार निमकर व आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

राजुरा तालुका प्रतिनिधी:- सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरदर पटेल महाविद्यालयातील वर्ग १२ वी च्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व क्रिडा क्षेत्रात जिल्हा व राज्यस्तरावर कर्तबगारी दाखऊन पुरस्कार प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दि.११.०९.२०२३ रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे होत्या तर प्रमूख अतिथी मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे चे आमदार किशोर जोरगेवार, जिनेश पटेल, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य स्वप्नील माधमाशेट्टीवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.जे.खैरवार, प्रा. सुमेधा श्रीरामे सह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रमाने प्राप्त केलेल्या यशाबद्धल मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मल्लेलवार यांनी तर आभार प्रा. पेटकर यांनी मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page