Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीभारती शिवणकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
spot_img

भारती शिवणकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार


गडचिरोली प्रतिनिधी:-
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी केंद्रातील जिप उच्च प्राथमिक शाळा दिभना येथील उपक्रमशिल मुख्याध्यापिका भारती सुनील शिवणकर यांची यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
भारती शिवणकर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबविले. मूल्यशिक्षण देणे, पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे व लोकसहभाग मिळविणे, असे अनेक उपक्रम त्या सतत राबवित असतात. त्यांनी मुख्याध्यापकाचे पद सांभाळून एम. ए. बी. एडचे शिक्षण पूर्ण केले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मुलभूत क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत फुलोरा उपक्रमामध्ये दिभना शाळेने उच्चांग गाठला आहे. सर्वात पहिली प्रारंभिक मुक्त शाळा म्हणून मान मिळविला आहे. त्यांच्या शाळेत राष्ट्रीय, विभागीय स्तरावरील अधिका-यांपासून तर शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा शाळेला भेटी दिली आहे. आज एक आदर्श शाळा म्हणून त्यांच्या शाळेचा नावलौकीक आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शिकलेले विद्यार्थी डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, शिक्षक, मोठमोठे व्यापारी उत्तम नागरिक म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानदानाबरोबरच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, मार्गदर्शन करणे, सामाजिक बांधिलकी जपणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे यासह विविध व्यसनापासून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करणे आदी विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी जिप व पंस तथा सामाजिक संस्थांकडून त्यांचा सत्कार झाला आहे. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल जिपने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केलेला आहे. त्यांच्या यशाबद्दल पंसचे संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, केंद्रप्रमुख प्रभाकर बारसिंगे, सरपंच रमेश गुरनुले, शा. व्य. समितीचे अध्यक्ष विलास जेंगठे, सदस्य, केंद्रातील सर्व शिक्षक, हितचिंतक व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page