Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीशेडमाके विद्यालयात पाककृती स्पर्धेचे आयोजन
spot_img

शेडमाके विद्यालयात पाककृती स्पर्धेचे आयोजन


केंद्रप्रमुखांनी केले पाककृतीचे निरीक्षण
चामोर्शी :- जिल्हा परिषद गडचिरोली , शिक्षण विभाग – पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत केंद्र आमगाव महालच्यावतीने आयोजित पाककृती स्पर्धेचे आयोजन शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आमगाव महाल येथे करण्यात आले . सदर पाककृती स्पर्धेचे उद्घाटन आमगाव महाल केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र वासेकर यांनी केले व विद्यार्थ्यांद्वारे तयार केलेल्या पाककृतीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले . यावेळी शाळेचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार तर परीक्षक म्हणून रुचिता बंडावर , श्रुती मोतकुरवार यांनी भूमिका बजावली . तर पोषण आहार शिक्षक अनिल निमजे यांनी विद्यार्थ्यांना पाककृती विषयी गुणदान पद्धती विषयी तृणधान्यातील पौष्टिकता , तृणधान्याचा दैनंदिन आहारात उपयोग , आरोग्य विषयक लाभ , चव , मांडणीतील नाविन्यपूर्णता , पाककृती बनवण्याची सुलभता व इंधन बचत यावर गुणदान असल्याचे मार्गदर्शन केले . यात 37 पाककृतींचे विद्यार्थ्यांद्वारे प्रदर्शन करण्यात आले . यात अवंत चंद्रभान नैताम प्रथम , कुमारी अवंतिका अविनाश गयाली द्वितीय , तर आरूष चंद्रभान नैताम तृतीय क्रमांक पटकावला . या स्पर्धेतील खाद्यपदार्थ विक्रीसाठी खुले करण्यात आले . या स्पर्धेसाठी सुरेश केळझरकर , पुरुषोत्तम गुरुनुले , गजानन बारसागडे , चंदू सातपुते , नरेंद्र चिटमलवार , रोशन वासेकर , अभिषेक ढोंगे , रोशन वासेकर , गणेश कोपुलवार , विशाल मंडल , स्वप्नील गुज्जलवार आदींनी मोलाचे सहकार्य करून पाककृती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले .पाककृती स्पर्धेचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे यांनी केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page