Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरजल्लोष श्रावणाचा कार्यक्रमात महिलांनी घेतला विविध स्पर्धेत सहभाग
spot_img

जल्लोष श्रावणाचा कार्यक्रमात महिलांनी घेतला विविध स्पर्धेत सहभाग

  • माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केले मार्गदर्शन.
  • भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राजुरा तर्फे आयोजन.

राजुरा 11 सप्टेंबर:-

भारतीय जनता महिला मोर्चा तालुका शहर राजुराच्या वतीने जल्लोष श्रावणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री गणेशाची पूजा करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांचे महिला मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. जल्लोष श्रावणाचा कार्यक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी उपस्थित महिला भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच उत्कृष्ट नृत्य करणारी कु. इशा नाखाडे हिला उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. विविध खेळामध्ये उत्कृष्ट खेळ सादर केला अश्या विजेत्यांना भेट वस्तू देण्यात आले.
यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, ज्योती जावरे, नम्रता खोंड उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरूपा झंवर यांनी संचालन माजी नगरसेविका उज्वला जयपूरकर यांनी केले. कार्यक्रमयशस्वी करण्याकरिता स्वरूपा झंवर,शितल वाटेकर, ममता केशेट्टीवार,दीपा बोंथला, राणी नळे,आशा चंदेल,यांनी अथक परिश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page