Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरजन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे आयुष्य
spot_img

जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे आयुष्य

ह.भ.प. दत्ता मसे महाराज; स्व. बापूराव गोरे यांच्या तेरावी निमित्त कीर्तन

राजुरा : – सृष्टीत मानवी जीवाला विशेष महत्व आहे. जगातील प्रत्येक गोष्ट विनाशी आहे, मृत्यूशिवाय जन्माला अर्थ नाही. जन्म आणि मृत्यू ही एकाच प्रवाहाची दोन टोके आहेत, यामुळे जीवन आनंदी, सुखी समाधानानाने जगले पाहिजे. आयुष्य हे विधात्याचे लिहिलेलं एक पान आहे. पहिलं पान जन्म तर शेवटचं पान मृत्यू आहे. जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य असल्याचे मत ह.भ.प. दत्ता मसे महाराज यांनी जैतापूर येथे आयोजित स्व. बापूराव गोरे यांच्या तेरावी निमित्त कीर्तन कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केले आहे.

यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. माणिक रोकडे, रामचंद्र गोहोकार, हेमंत तेजने (हिंगणघाट) वैभव साटोने (समुद्रपुर) वसंता बोबडे, शाहींद्र मडावी, पवन हनुमंते, सुधाकर गोरे, प्रभाकर गोरे, भाऊराव गोरे, चंटुजी वासाडे, सुभाष मसे, श्रीहरी बेरड, सुनील खारकर उपस्थित होते. गोरे परिवारांवर स्व. बापूराव गोरे यांच्या मृत्यूमुळे दुखवटा पसरला असून यातून सावरण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करीत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यांच्या हातून चांगले कार्य घडले आहे, त्यांच्यासाठी श्रद्धांजली पूर्वक किर्तनाचा कार्यक्रम होत असतो. परंपरागत विधीला फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला असल्याचे मत आजनगाव येथिल माणिक रोकडे महाराज यांनी व्यक्त केले आहे.

स्व. बापूराव गोरे यांच्या तेरावी निमित्त विधिपूर्वक कार्यक्रम करून मृतांच्या पश्च्यात्य शोक व्यक्त न करता गोरे परिवारांनी समाज प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित केले. हा कार्यक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असून मृत व्यक्तींच्या पश्च्यात्य अवाढव्य खर्च न करता समाज जागृती करण्याचा हा कार्यक्रम असल्याचे मत कार्यक्रमाला उपस्थित गोरे मित्र परिवार व नातेवाईक यांनी व्यक्त केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page