Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरइन्फंट काॅन्व्हेंट येथे ग्रँडपॅरेंट्स डे उत्साहात साजरा
spot_img

इन्फंट काॅन्व्हेंट येथे ग्रँडपॅरेंट्स डे उत्साहात साजरा

राजुरा (ता. प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे प्री प्रायमरी विभागामध्ये लहान मुलांच्या आजी – आजोबांकरिता ग्रँडपॅरेंट्स डे चे आयोजन करण्यात आले. यामध्ये आजी आजोबांचा आणि नातवांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी लहान मुलांनी आपल्या आजी-आजोबांचे पाय धुवून, टिळा, आरती करून स्वागत केले. त्यानंतर आजी – आजोबांकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आजी – आजोबांसोबत नातवांचा सुद्धा सहभाग करून घेण्यात आला होता. त्यानंतर आजी – आजोबांकरिता त्यांच्या काळातले सुप्रसिद्ध असलेले गाणे वाजवण्यात आले. ज्याच्यावर आजी – आजोबांनी नृत्याचा ठेका धरला. या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे आजी – आजोबांनी आनंद व्यक्त केला. विविध खेळामध्ये जिंकलेल्या प्रतियोगिना बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन नीता न्यालेवर, आभारप्रदर्शन गीता बुऱ्हान यांनी केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page