Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरतालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काॅन्व्हेंटचा द्वितीय क्रमांक.
spot_img

तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काॅन्व्हेंटचा द्वितीय क्रमांक.

राजुरा (ता. प्र) :– राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित तालुका स्तरीय विज्ञान नाटयोत्सव 2023- 24 शिक्षण विभाग, पंचायत समिती राजुरा द्वारा इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आयोजित करण्यात आले होते. यात एकूण १४ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून इन्फंट काॅन्व्हेंट च्या सीबीएसई शाखेतील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. इन्फंट काॅन्व्हेंट च्या संघात कु. क्रांती लिहितकर, कु. तनवी चटके, कु. आस्था चांदेकर, यथार्थ ढवस, प्रेषिक आलाम, अविष्कार चव्हाण, समीर बोडेकर, प्रियांशू मेश्राम यांनी अश्विनी फासला, सुषमा साळवे, सरोज गाडगे या शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्याच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, सी बी एस ई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी, या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page