Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीस्काऊट गाईड कार्यालयातर्फे मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा
spot_img

स्काऊट गाईड कार्यालयातर्फे मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

गडचिरोली :-भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने मुकबधीर विद्यालय, नवेगांव गडचिरोली येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी हायस्कूल गडचिरोली येथील गाईड कॅप्टन श्रीमती कावटे मॅडम यांचेसह गाईडसनी मूकबधिर विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. रक्षाबंधन कार्यक्रमाचे वेळी गाईडस आणि मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नरेश भारस्कर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक श्रीमती नीता आगलावे, विवेक कहाळे, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती प्रियंका असूटकर, शाळेचे अधिक्षक अविरामजी हारगुडे इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षक श्री मनीष टप्पे यांनी केले तर आभार श्रीमती यामिनी तुमराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विशेष शिक्षक मयुर चन्नावार, विशेष शिक्षिका श्रीमती ज्योत्स्ना प्रधान, शाळेचे कर्मचारी दर्शन तारक, वासुदेव शेरकी, स्काऊट गाईड कार्यालयाचे कर्मचारी पियुष नंदनवार, प्रमोद पाचभाई व श्रीकृष्णा ठाकरे यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page