Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली (खु) विद्यार्थ्यांचे विजयाचे सत्र सुरूच
spot_img

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली (खु) विद्यार्थ्यांचे विजयाचे सत्र सुरूच

“सलग दुसऱ्याही वर्षी खो -खो स्पर्धेत अव्वल”

राजुरा : – तालुका क्रीडा समितीद्वारा शालेय क्रीडा स्पर्धा 2023 चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली खुर्द व महर्षी उत्तम स्वामी महाराज क.महाविद्यालयाने खो- खो स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१७ वयोगटातील मुले व मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवित विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली खुर्द चा दबदबा कायम ठेवला आहे. या विजयाबद्दल मुख्याध्यापक रुपेश सोळंके यांनी मुला-मुलींचे कौतुक करून ज़िल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अशीच कामगिरी करावी अश्या शुभेच्छा दिल्या.

विजयी संघाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेतील शिक्षक रवींद्र गोरे, संतोष वडस्कर, प्रवीण गुडपल्ले, अशोक पवार, चौधरी , मोरे, कपिल बोपनवार , साहिल सोळंके शिक्षिका टोंगे, डाहुले, रेश्मा शेख यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page