Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालयात उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गोपालराव गव्हारे यांचा सत्कार
spot_img

बोमनवार विद्यालयात उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गोपालराव गव्हारे यांचा सत्कार

चामोर्शी – शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री गुरुकृपा समाजसेवी संस्था चामोर्शी द्वारा संचालित स्थानिक जा. कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात शाळेचा माजी विद्यार्थी प्रफुल गोपालराव गव्हारे- नवनियुक्त उपविभागीय कृषी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष – गुरुकृपा समाजसेवी संस्थेचे उपाध्यक्ष – प्र .सो.गुंडावार , प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्षा – सौ. छायाताई बोमनवार ,संचालक – विजय भाऊ पालारपवार, संचालिका- सौ. नम्रताताई बोमनवार, प्र.प्राचार्य – ईतेंद्र चांदेकर ,प्राध्या. नमूदेव कापगते उपस्थित होते.

 मान्यवरांच्या हस्ते प्रफुल गोपालराव गव्हारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सत्कारमूर्ती प्रफुल गव्हारे यांनी आपल्या मनोगतातून घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला असे प्रतिपादन केले.पुढे त्यांनी  प्राथमिक शिक्षण मालेर (माल)येथून , माध्यमिक शिक्षण विश्वशांती विद्यालय कुनघाडा ,उच्च माध्यमिक  शिक्षण जा.कृ. बोमनवार ,विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी तसेच पदवी पर्यंतचे शिक्षण केवलरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येथे घेतले. एम. एस. सी. -  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा - अहमदनगर येथे सुरू आहे.

एमपीएससी परीक्षेची तयारी कोणतेही शिकवणी वर्ग न लावता भरिव अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली. या परीक्षेत महाराष्ट्रातून 20 वा क्रमांक तर ओबीसी प्रवर्गातून 3 रा क्रमांक प्राप्त केला.

आपल्या मनात जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळते .नियमित अभ्यास, वेळेचा सदुपयोग करावा ,आई - वडिलांचे, शाळेचे, गावाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन केले.

 प्रफुल गव्हारे यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन- स शि .अशोक गजभिये तर आभार प्रदर्शन-स. शि . संतोष चावरे यांनी केले.

  याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,स्काऊट - गाईड, राष्ट्रीय सेवा मंडळ, विज्ञान छंद मंडळ, राष्ट्रीय हरितसेना पथकाचे पथक प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page