Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीगडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे पदाधिकारी मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) व...
spot_img

गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे पदाधिकारी मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचे मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड अभ्यासक्रमावरील माहिती वर्ग संपन्न

गडचिरोली प्रतिनिधी:-1972 पासून स्काऊट गाईड विषयाचा शालेय अभ्यासक्रमात एक वैकल्पिक विषय म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तीन वर्षाच्या बालकापासून ते पंचवीस वर्षाच्या युवक युवतींच्या मनावर संस्कारक्षम वयात व्यक्तिमत्व विकासाची उदात्त मूल्ये स्काऊट गाईड अभ्यासक्रमातून रुजवली जातात. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. चार भिंती बाहेरचे आनंददायी शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धती आहे. हि शिक्षण पद्धती छंदांकडून चरितार्थाकडे नेण्यास पूरक ठरते. या अभ्यासक्रमाची माहिती शिक्षकांना देण्याकरिता गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने स्काऊट गाईड विषयावरील माहिती वर्गाचे आयोजन दि. 24 ऑगस्ट, 2023 रोजी गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्याकरिता राणीदुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोली येथे दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी अहेरी, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड व सिरोंच्या तालुक्याकरिता राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली, ता.अहेरी येथे तसेच दि. 06 सप्टेंबर, 2023 रोजीआदर्श इंग्लिश हायस्कूल वडसा, ता. वडसा या ठिकाणी माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते. या माहिती वर्गामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 217 शिक्षकांनी सहभाग घेतला. माहिती वर्गाच्या यशस्वितेकरिता मा. उपशिक्षणाधिकारी समग्र शिक्षा अभियान श्रीमती लता चौधरी, मा. अमरसिंग गेडाम शिक्षण विस्तार अधिकारी तथा सचिव, गडचिरोली भारत स्काउट गाईड तसेच प्रत्येक तालुक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. माहिती वर्गामध्ये मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटक विवेक कहाळे,श्रीमती नीता आगलावे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती कांचन देशमुखे, स्काऊट मास्टर सुनील आईंचवार, सुरेश अलोने, रमेश पुराम, गाईड कॅप्टन श्रीमती आशा कारोडकर, श्रीमती ज्योती आत्राम व श्रीमती नीतू मालाकार यांनी कार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page