Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीआंतरराष्ट्रीय साक्षरता दिन - जनजागृती रॅली
spot_img

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन – जनजागृती रॅली

चामोर्शी :– आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जा.कृ . बोमनवार विद्यालयातून साक्षरता जनजागृती रॅली काढण्यात आली.
ही रॅली शा.शी. प्रमोद भांडारकर ,मनोज बोमनवार, स्काऊट मास्टर घनश्याम मनबतुलवार यांच्या नेतृत्वाखाली रॅली शाळेतून निघून साक्षरतेवर आधारित अक्षर कळे – संकट टळे, साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, वाचाल तर वाचाल, एक एक अक्षर शिकूया – ज्ञानाचा डोंगर चढू या ! विविध घोषवाक्याचे नारे देत मुख्य रस्त्याने फिरवत बस स्थानकावरून परत आले.

  या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे उपस्थित होते.

     या रॅलीत स. शि. - अशोक गजभिये, महेंद्र किरमे ,संजय हिचामी, प्रवीण कन्नाके, अमर कूत्तरमारे, पराग धात्रक ,जी. डी .भोंगाळे स्काऊट - गाईड, विद्यार्थी सहभागी झाले होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page