Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीनिशिगंधा इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
spot_img

निशिगंधा इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी


चामोर्शी:- येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलमध्ये 7सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी फोड तथा वेशभूषा स्पर्धा आयोजित करून साजरी करण्यात आली. यामध्ये शाळेतील नर्सरी एलकेजी व युकेजी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.वेशभूषा स्पर्धेमध्ये विराज पिपरे ,राजवीर चळकलवार ,भावेश गिरोले या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या वेशभूषेकरिता प्रथम क्रमांक पटकाविला तसेच राधाच्या वेशभूषे करिता रेयांंशी सरकार, प्राप्ती रामगिरवार ,ओवी नैताम या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला.याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल सौ संचालिका पी. वालदे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकांनी तथा शिक्षकांनी खूप मोलाचे योगदान दिले यावेळी शिक्षक सिंधू रामटेके ,हिराचंद उंदीरवाडे ,मोरेश्वर कुनघाडकर, मनीषा अवताडे ,सुमित दास ,मुक्ता तातावर ,वंदना भरणे ,धनिष्ठा उंदीरवाडे ,अंजुम सय्यद ,चेतना खरवडे ,प्रकाश गेडाम ,अर्चना साखरे, रीना हलदर ,फिलिप लिम्मा ,शाहिना खान ,लक्ष्मीकांता देशमुख, सपना शर्मा ,बिना मंडल ,शिवानी साना शिक्षकेतर कर्मचारी अनुसया यारावर, सविता कटलावार ,अनिता मेक रतिवार, कल्पना आकेवार ,अंतकला नैताम ,सावजी सहारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे राहुल लोकविकास मंडळाचे उपाध्यक्ष विवेक भाऊ सहारे तथा कोषाध्यक्ष वक्तुजी उंदीरवाडे , सदस्य माणिक साखरे व पालकांनी कौतुक केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page