Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीअशोक बोरकुटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
spot_img

अशोक बोरकुटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

शिक्षक दिनी मुंबईत पुरस्कार प्रदान
चामोर्शी:- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहूर्ली येथील विषय शिक्षक अशोक बोरकुटे यांना राज्य शासनाने त्यांच्या शैक्षनिक कार्याची दखल घेत त्यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२२-२३ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर,, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांच्या हस्ते आणि लोकसभा सदस्य अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या उपस्थितत शिल्ड , प्रमाणपत्र व ऐक लाखचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
अशोक बोरकुटे,विषय शिक्षक हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहूर्ली, पंचायत समिती मुलचेरा, जिल्हा गडचिरोली,येथे कार्यरत असून ते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक अनेक उपक्रमांचे आयोजन केले त्यात” टाकाऊ वस्तु पासून विज्ञान प्रयोग शाळा” “तरंगते वाचनालय” “विद्यार्थी बचत बँक” परिसरातून विज्ञान” या नवोपक्रम,शैक्षणिक गुणवत्ता विकासामुळे शाळेची पटसंख्या 36 वरून आज 84 इतकी झालेली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश , एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आतापर्यंत 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश,. स्पर्धा परीक्षा ,व शिष्यवृत्ती परीक्षा करीता विद्यार्थ्यांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ , विज्ञान शिक्षक असून”ज्ञानरचनावाद”यावर अनेक शैक्षणिक साहित्याची निर्मिती , पाच वेळा राज्य विज्ञान प्रदर्शनात शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती , जिल्हा स्तरावर विद्यार्थी व शिक्षकास पुरस्कार . विद्यार्थ्यांना राज्य विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर पोचविण्याचे कार्य,शैक्षणिक,सामाजिक, राष्ट्रीय व मानवतावादी कार्याची दखल घेऊन महसूल विभाग गडचिरोली,यांनी प्रजासत्ताक दिनी व पंचायत समिती मूलचेरा, शिक्षण विभागाद्वारे दोनदा गौरविण्यात आले होते.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी निवड करून ०५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईच्या नारीयम पाईंट जवळील टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग. आर्ट्स हॉलमध्ये अशोक.बोरकुटे यांना “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी म. रा.प्रधान सचिव रणजितसिंग देओल ( भा. प्रं. से) व शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे ( भा.प्र.से.) व मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे हेही उपस्थित होते .त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण शेत्रातून व मित्र परिवार कडून अभिनंदन केले जात आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page