Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
spot_img

देवतळे महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

चामोर्शी :- येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी.जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “माझ्या कल्पनेतील शिक्षक” या विषयावर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपापले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा. डॉ. राजेंद्र झाडे यांनी “विद्यार्थ्यांनी आदर्श जीवन जगावं” अशी सुंदर शिकवण शिक्षक दिनाच्या निमित्ताने देऊन विद्यार्थ्यांना बहुमोलाच मार्गदर्शन केल.
स्पर्धेचा निकाल वेळीच घोषीत करण्यात आला. प्रथम क्रमांक समीर गुंडेकवार( बी.ए.तृतीय वर्ष), द्वितीय क्रमांक रिया सातपुते(बी.ए.प्रथम वर्ष), आणि तृतीय क्रमांक अमित किनेकर(बी.ए.प्रथम वर्ष) व कृतीका तुंबडे(बी.एस.सी. प्रथम वर्ष) या विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणुन प्रा.वैभव म्हस्के सर यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी त्यांनी “विद्यार्थ्यांनी व्यासपीठाला न घाबरता समोर येऊन वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले बहुमोल विचार मांडले पाहिजे” असे महत्वाचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आंबेकर, प्रा. बाबनवाडे, प्रा. वैशाली कावळे, प्रा. अरुण कोडापे, प्रा. मिनल गाजलवार,प्रा. जयश्री बोबाटे, प्रा. उसेंडी मॅडम, प्रा.शुभांगी खोबे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
सर्व प्राध्यापकांनी शिक्षक दिननिमित्त व्यासपीठावरून आपापले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी पायल कुनघाडकर हिने केले तर प्रास्ताविक विद्यार्थी समीर गुंडेकवार व आभार विद्यार्थीनी कृतिका तुंबडे हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतीक विभाग सहकारी प्रा.वैभव म्हस्के, प्रा.रोशन गेडाम, प्रा.संकेत राऊत व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page