Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरओबीसींसाठी वसतिगृह, स्वाधार योजना व परदेशी शिष्यवृत्ती सुरु करण्यासाठी दिले निवेदन
spot_img

ओबीसींसाठी वसतिगृह, स्वाधार योजना व परदेशी शिष्यवृत्ती सुरु करण्यासाठी दिले निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास भिक माँगो सत्याग्रह करुन प्रत्येक जिल्ह्यातून सरकारला पाठविणार 72 रु.

राजुरा (ता. प्र) :– मराठा सेवा संघ व इतर सामाजिक संघटना, शाखा राजुरा द्वारा मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, राजुरा मार्फत मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व सचिव महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या मर्यादेत प्रति जिल्हा 200 याप्रमाणे 36 जिल्ह्यांसाठी एकूण जिल्हानिहाय दोन याप्रमाणे 72 वसतिगृहे कार्यान्वित करण्यास दि. 28.02.2023 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली होती. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजनेच्या धर्तीवर ईतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधार योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 29.12.2022 रोजी, मा.ना. देवेद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केली होती.
पावसाळी अधिवेशनात मा. अतुल सावे, मंत्री बहुजन कल्याण विभाग यांनी परदेशी शिष्यवृत्ती योजनेत 50 जागांवरून वाढवून 75 करण्यात येईल यासाठी सुद्धा मान्यता मिळाली आहे असे उत्तर दिले होते.
परंतु वरीलपैकी एकही योजना अजुन पर्यन्त अंमलात आलेली नाही. जर 11 सप्टेंबर पर्यन्त मागण्या पूर्ण न झाल्यास भिक माँगो आंदोलन करण्याचा इशारा वरील संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रसंगी दिनेश पारखी, नंदकिशोर वाढ़ई, केशवराव ठाकरे, बापूराव मडावी, संतोष देरकर, सुधाकर काकड़े, रंजीत सुतार, धर्मु नगराळे, देवराव निब्रड, बाबूराव पहानपटे, दिलीप गिरसावळे, बाबूराव मुसळे, गौरव जीवतोड़े, प्रवीण चौधरी, नंदकुमार मोहुर्ले, राजू पिंपळशेंडे, अंसार खान, सय्यद फजल, शाहिद हुसेन, ज़फ़र शेख, निज़ामुद्दीन, मुजाहिद शेख, अबु झाईद व अंजलीताई येरकल उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page