Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीसर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास काँग्रेस पक्ष कटीबद्ध-- विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार--------------------------------माणसाला...
spot_img

सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास काँग्रेस पक्ष कटीबद्ध– विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार——————————–माणसाला माणूस जोडण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा

चामोर्शी:- विद्यमान सरकार तरुणाच्या हाताला रोजगार देण्यास सपशेल अपयशी ठरले आहे त्यामुळे बेरोजगार युवकांची जगण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे तसेच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असून गोरगरीब जनतेला दिल्या गेलेल्या गॅस दरवाढीचा फटका सहन करावा लागत असून शासनाची उज्ज्वला योजना निकामी ठरली यासोबतच खनिज तेल असलेल्या पेट्रोल , डिझेल यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने वाहनधारकांना दरवाढीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे यावर मात्र शासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.शेतकरी व गोरगरीब जनतेला न्याय देणारा काँग्रेस हाच पक्ष.असल्याचे महारष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सांगितले
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान आयोजन केलेल्या जनसंवाद यात्रे दरम्यान ४ सप्टेंबर रोजी बाजार चौक चामोर्शी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत होते.
पुढे बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात खताचे भाव मर्यादित होते त्यामुळे शेतकरी पिकांची लागवड करून उत्पादन घेऊ शकत होता आज मात्र चित्र उलटे दिसत आहे रासायनिक खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या असून धानाला अपेक्षित हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तसेच शेतकऱ्यांच्या तांदळावर २० टक्के निर्यात कर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना १५ हजार देण्याचे शासनाने आश्वासन दिले मात्र अजूनही ते दिले नसल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.तालुका जवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर चिंचडोह बॅरेज असून शेतकऱ्यांना शेतजमीनीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र अजूनही चिचडोह येथील पाणी दीना कॅनल मध्ये टाकण्यात आले नसल्याने धोरण उशाला , कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.काही दिवसांपूर्वी हरणघाट या मुख्य मार्गाचे चार कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती करण्यात आली मात्र रस्त्याची गुणवत्ता नसल्याने आज या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणीना तोंड देत ये- जा करावे लागत आहे. जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षण प्रश्न अजूनही सुटला नसल्याने ओबीसी जनतेची शासनाकडून दिशाभूल केली जात असून या भूलथापांना बळी पळू नका असे आवाहन केले कोनसरी येथील प्रकल्पात स्थानिकांना रोजगार दिला नाही तर आम्ही प्रकल्पावर धडक देउ असे सांगत आम्ही स्थानिक युवकाना रोजगार देण्याचा प्रयत्न जरूर करू ,माणसाला माणूस जोडण्यासाठी ही जन संवाद यात्रा आहे या यात्रेत सामील होऊन आपली मूठ मजबूत करावे असे आव्हान केले.
सर्वप्रथम विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांचे चामोर्शी शहरात आगमन होताच लक्ष्मी गेटवर जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ उसेंडी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, प्रमोद भगत यांनी स्वागत केले त्यानंतर त्यांनाहजारों च्या संख्येने वाजत गाजत रॅलीद्वारे सभास्थळी आणण्यात आले.
या सभेत मंचावर माजी आमदार आनंदराव गेडाम , माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी , जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे , अड.राम मेश्राम, हसनभाई गिलानी, विश्वजित कोवासे , काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, डॉ.नितीन कोंडवते, हसंन भाई गिलानी , माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, म. प्रं.सचिव पंकज गुद्देवार, चंदाताई कोडवते, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, माजी जी.प.सदस्य कविता भगत यांच्यासह अनिल कोठारे , प्रदेश सदस्य तथा पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर , तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत , माजी तालुकाध्यक्ष विनोद खोबे,संजय वड्डेट्टीवार, लोकेश शातलवार, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ निखाडे माजी सभापती सुमेध तुरे, माजी सभापती प्रेमा आईचंवार, उपसभापती स्नेहा सातपुते, नगरसेविका वर्षा भिवापूरे, दिंगबर वासेकर आदी उपस्थित होते
, यावेळी प्रमोद भगत यांनी तालुक्यातील हरणघाट रस्ता, भेंडाळा परिसरातील. लोडशेडींग , आदी तीन समस्या प्रास्ताविक मधून मांडल्या तर जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हण वाडे यांनी शासनाच्या शेतकरी, बेरोजगारी, महागाई , लोड शेडींग आदीच्या समस्यांवर प्रकाश टाकत यासाठी जन संवाद यात्रा असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन निकेश गद्देवार यांनी तर आभार राजेश ठाकूर यांनी केले यासह जिल्ह्यातील युवक , महिला , शेतकरी , काँग्रेसचे जेष्ठ नेते, पदाधिकारी ,सर्व सेलचे अध्यक्ष ,तालुकाध्यक्ष ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page