Saturday, February 24, 2024
Homeगडचिरोलीरास्ता रोको आंदोलन करून दिवंगत नेत्याला वाहिली श्रद्धांजली
spot_img

रास्ता रोको आंदोलन करून दिवंगत नेत्याला वाहिली श्रद्धांजली


ता.प्र.कुरखेडा:-दिनांक 3 सप्टेंबर 2023 शेतकरी नेते शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार दिवंगत नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त जिल्हा शेतकरी संघटना गडचिरोली व विदर्भ राज्य आंदोलन समिती कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा पुराडा येथील रामगड – कोरचि-कुरखेडा टी-पॉइंट येथे स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती व शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच परिसरातील अन्य समस्या केंद्र व राज्य शासनाच्या निदर्शनास आणण्याकरिता शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२:०० वाजता पासून ०२:०० वाजता पर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा आंदोलन सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावली. तरीही भर पावसात सुद्धा आंदोलक आंदोलन स्थळी हजर होते. या आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी कुरखेडा येथील नायब तहसीलदार, पुराडा येथील तलाठी, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता, आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कोरची चे व्यवस्थापक आंदोलन स्थळी पोहोचले होते. व त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ही चर्चा घडवून आणण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक पवार, यांनी मोलाची भूमिका बजावली. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाप्रमुख व माजी कृषी सभापती जि.प. गडचिरोली राजेंद्रसिंह ठाकुर, जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासिर जुम्मन शेख, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष घिसू पा.खुणे कोअर कमिटी सदस्य शालिक पाटील नाकाडे पुराडा चे सरपंच अशोक उसेंडी, उपसरपंच तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका प्रमुख रामचंद्र रोकडे, कुरखेडा शहर प्रमुख मुक्ताजी दुर्गे, युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष नेपाल मारगाये, सोशल मिडिया तालुका अध्यक्ष हेमंतकुमार मरकाम, तालुका कार्यकारणी सदस्य रामचंद्र कोडाप महिला आघाडी तालुका प्रमुख वडसा श्रीमती अर्शी शेत, व पुराडा खेडेगाव रामगड, हेटीनगर, चिरवाडी, लक्ष्मीपूर, कन्हारटोला व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page