Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरजिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न.
spot_img

जिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न.



( ता.प्रतिनिधी मयुर खेरकर)बल्लारपूर 4 सप्टेंबर:-
महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या १४ व १६ वयोगट व पुणे येथे होणाऱ्या १८ व २० वयोगट राज्यस्तरीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित चंद्रपूर जिल्हास्तरीय ज्युनियर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २ व ३ सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीं क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरुवात मैदान पूजनाने करण्यात आली त्या प्रसंगी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनची कोषाध्यक्ष पूर्वा खेरकर यांनी केले. स्पर्धा ८/१०/१२/१४/१६/१८ व २० वयोगटातील मुले व मुली यांचा साठी घेण्यात आली. जिल्हा भरातून दोनशे हून अधिक खेळाडूंनी स्पर्धेला प्रतिसाद दिला होता. विजयी झालेला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्य स्तरीय स्पर्धेकरिता सहभागाची संधी मिळेल. चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सुरेश अडपेवार यांचे मार्गदर्शनात स्पर्धा प्रमुख म्हणून पूर्वा खेरकर व वर्षा कोयचाडे यांनी काम पाहिले तर स्पर्धा तांत्रिक प्रमुख म्हणून विजय भगत, स्वप्नील सायांकर, चैताली किन्नाके, मयूर खेरकर हे होते, तर पंच म्हणून दर्शन मासिरकर, सूरज गेडाम, रोहित बेर्डे, सरोज यादव, अविनाश जाधव, सीमा बेहरा, नितेश आत्राम, चेतन भजभुजे, प्रियांका मांढरे, शीतल मांडवकर यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे शिवराज भरडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page