Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालयात राखी तयार करणे व रक्षाबंधन कार्यक्रम
spot_img

बोमनवार विद्यालयात राखी तयार करणे व रक्षाबंधन कार्यक्रम

चामोर्शी- शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचे, रक्षाबंधनाचे महत्त्व कळावे यासाठी जा.कृ.बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विजयालक्ष्मी पंडित – गाईड स्काऊट पथकाद्वारे राखी तयार करणे व रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला.

  प्रथम गाईडनी राख्या तयार केल्या. गाईड कॅप्टन यांनी वृक्षाला राखी बांधून वृक्षाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला.

       याप्रसंगी प्र. प्राचार्य ईतेंद्र चांदेकर ,प्राध्या. नमूदेव कापगते,स्काऊट मास्टर घनश्याम मनबतुलवार, अमर कूतरमारे ,पराग धात्रक, गाईड कॅप्टन कु.जी.डी. भोंगाळे, कविता बंडावार, बुल्लू विश्वास उपस्थित होते.

    गाईडने प्रथम प्र. प्राचार्य ईतेंद्र चांदेकर ,प्रा.नमूदेव कापगते, स्काऊट मास्टर ,शिक्षक, प्राध्यापक यांना राख्या बांधल्या.गाईडने 30 स्काऊट विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

 सूत्र संचालन - स्का. मा. घनश्याम मनबतुलवार, आभार प्रदर्शन - गाईड कॅप्टन-  जी .डी भोंगाळे यांनी केले.

याप्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी वृंद, स्काऊट, गाईड विद्यार्थी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page