Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरजनसंवाद पदयात्रेला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.
spot_img

जनसंवाद पदयात्रेला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

राजुरा (ता. प्र) :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा काँग्रेसच्या वतीने राजुरा येथील सोमेश्वर मंदिर येथून सकाळी ६ वाजता जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. प्राचीन सोमेश्वर मंदिरातील भगवान शंकरजीचे दर्शन घेऊन पदयात्रा सुरू झाली. यादरम्यान राजुरा, बामणवाडा, चुनाळा, सातरी, चनाखा, पंचाळा, कोहपरा व विहीरगाव असा २५ किलोमीटर प्रवास करीत ठिक ठिकाणी केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे सरकार पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्यय – अत्याचार याबद्दल जनजागृती करणारे परिपत्रके वाटून, जनजागृतीपर नारे, भजन – किर्तन करून, कार्नर सभा घेऊन नागरिकाशी थेट संवाद साधण्यात आला. सकाळी राजुरा येथून सुरू झालेली पदयात्रा दुपारी सातरी येथे पोहचली. येथे भोजन उरकून लगेच पुढील प्रवासाला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात विहीरगाव येथे पोहचून पदयात्रेचा पहिला दिवस पुर्ण होईल. संध्याकाळी विहिरगाव येथे सभा पार पडले व पदयात्रेत सहभागी सदस्य येथेच मुक्काम करून उद्या पून्हा दुसर्‍या दिवशीच्या प्रवासाला निघण्याचे नियोजन आहे.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे जेष्ठ विधीतज्ञ तथा कृ. उ. बा. स. संचालक अॅड. अरूण धोटे, अभिजीत धोटे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवादलाचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, माजी जि प सदस्या मेघाताई नलगे, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, आशिष नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, प स सदस्य तुकाराम माणूसमारे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, दिपा करमनकर, सागर लोहे, कविता उपरे, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, अर्चना गर्गेलवार, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, अशोक राव, यश मोरे, संदीप आदे, सर्वानंद वाघमारे, भाष्कर चौधरी, श्याम गरडे, मारोती मोरे, पंचाळा सरपंच शोभा मडावी, उपसरपंच आकेश चोथले, माजी सरपंच सुधाकर गिरसावळे, योगिता मून, आनंदराव गावंडे, कोहपराचे सरपंच राजेश मेश्राम, उपसरपंच पुजाताई शेषराव मडावी, माजी सरपंच वर्षा पिंगे, संजय कुळमेथे, पुरुषोत्तम पिंगे, सुनिल पिदुरकर, विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, रविकांत होरे, प्रभाकर साळवे, मनोहर धुळसे यासह राजुरा तालुका काँग्रेस, महिला कॉंग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page