Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूर3 सप्टेंबर ला शरद जोशी यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबीर
spot_img

3 सप्टेंबर ला शरद जोशी यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबीर


राजुरा, ता.प्र. –
शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांची जयंती दरवर्षी रक्तदानाने साजरी होते. यावर्षीही दिनांक 3 सप्टेंबर 2023, रोज रविवारला राजुरा उपजिल्हा रुग्णालया समोर राम मंदीर सभागृहात शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप करणार असून तालुक्यातील जेष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात युवक, कार्यकर्ते, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदरणीय शरद जोशी यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी यांच्या पदाधिका-यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page