Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीबॅडमिंटन स्पर्धेत 5 मुले व 4 मुलींची जिल्हास्तरावर निवड
spot_img

बॅडमिंटन स्पर्धेत 5 मुले व 4 मुलींची जिल्हास्तरावर निवड

चामोर्शी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ,जा. कृ.बोमनवार विद्यालयातील 17 वर्षे वयोगटातील 5 मुले व 4 मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून सुयेश मिळविले.त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
यामध्ये मुले- यश गण्यारपवार, तन्मय चौधरी, प्रिथू राय, प्रेम निर्मलवार, शिरीष केंद्रे यांचा समावेश आहे. तर मुलींमध्ये कु.मयुरी बोरकर, समीक्षा देवकते ,पूर्वा ईटकेलवार, रुचिका चांदेकर यांचा समावेश आहे.
यांना शारीरिक शिक्षक प्रमोद भांडारकर, मनोज बोमनवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सुयशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा – सौ.छायाताई बोमनवार,उपाध्यक्ष – श्री प्र.सो. गुंडावार गुरुजी ,सचिव – श्री रविभाऊ बोमनवार,संचालक मंडळ आणि प्र. प्राचार्य- ईतेंद्र चांदेकर, वर्गशिक्षक, प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page