Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरस्वतःच्या प्रगती सह, देशाच्या उन्नतीसाठी महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे- माजी आमदार सुदर्शन...
spot_img

स्वतःच्या प्रगती सह, देशाच्या उन्नतीसाठी महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे- माजी आमदार सुदर्शन निमकर

राजुरा प्र.:– जिल्हा कौष्यल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपुर मॉडल करिअर सेंटर तथा सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत दि.२९ ऑगस्ट २०२३ रोजी स्व.शांतारामजी पोटदुखे सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घघाटक पोलीस अधिक्षक मा. रविंद्रसिंग परदेशी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर च्या अध्यक्ष श्रीमती सुधाताई शांतारामजी पोटदुखे, मुख्य अतिथी सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सरदार पटेल महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. प्रमोद कातकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, प्रा.ॲड.प्रिया पाटील मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मोलाचे मार्गदर्शन केले. या महिला रोजगार मेळाव्यात सात विविध कांपण्यांनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या. मेळाव्याला जिल्हाभरातून आलेल्या महिलांची प्रचंड उपस्थिती होती.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page