Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरपोदार इंटरनॅशनल स्कूल ,बल्लारपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस थाटात साजरा
spot_img

पोदार इंटरनॅशनल स्कूल ,बल्लारपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस थाटात साजरा

दि 31ऑगस्ट.
(त. प्र मयुर खेरकर)

बल्लारपूर:- येथील स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूल,बल्लारपूर येथे हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस थाटात साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासा बरोबर शारीरिक विकास व्हावा यासाठी प्राचार्य डॉ .राकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक मयुर खेरकर व शिक्षक वृंद नेहमी कार्यतत्पर असतात .प्रसंगी या निमित्ताने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश होता .वर्ग पहिला ते सातव्या वर्गापर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.मेजर ध्यानचंद यांची खिलाडू वृत्ती आजच्या युगातील खेळाडूंनी अवलंबली पाहिजे तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.राकेश रंजन यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हबीबा खान यांनी केले तर आभार निशा शेख यांनी मानले .कार्यक्रम पार पाडण्याकरता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page