Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीवकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार
spot_img

वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड येथील मुख्याध्यापक वकील शेख यांना यावर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

देसाईगंज प्रतिनिधी:- जय हिंद सेवाभावी सामाजिक संस्था परभणी व्दारा दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातील 22 व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
वर्धेचे खासदार श्री रामदास तडस आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री अरुण चौधरी यांच्या हस्ते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉक्टर सुभाष चौधरी, माजी पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत उदगीरकर,जय हिंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार, सुप्रसिद्ध कवी गझलकार सूत्रसंचालक श्री इमरान राही यांच्या प्रमुख उपस्थितीत वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार सोहळा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा नगरीत संपन्न झाला
वकील शेख यांना या पूर्वी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार,मानव संसाधन मंत्रालय भारत सरकारचा युवा पुरस्कार सह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा संबंध असुन,मुंबई दूरदर्शन,आकाशवाणी नागपूर वरून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत.त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल मो.आरीफ शेख हेडमास्टर रफी अहमद किदवाई प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल देसाईगंज यांनी व अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page