Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरतालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत व्हॅली्बॉल स्पर्धेचे उदघाट्न.
spot_img

तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत व्हॅली्बॉल स्पर्धेचे उदघाट्न.

राजुरा :-

क्रीडा संचनालय पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील मैदानावर व्हॅली्बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. एस. एम. वारकड, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, आदर्श शाळा, प्रा. बी. यु. बोर्डेवार, तालुका क्रीडा समन्वयक हरिश्चंद्र विरुटकर, राजबिंद्र डाहुले, मलिक काझी, अल्पना कवाडे, भार्गवी कोडाली, सर्जेकर, चंद्रप्रकाश बुटले, पुंडलिक वाघमारे, इकबाल शेख, रवींद्र बेलेकर, शुभम बन्नेवार, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र विरुटकर यांनी केले. या खेळासाठी वयोगट 14, 17, 19 मुले व मुली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नितीन आत्राम, अविनाश जाधव, अंकित जीवतोडे, अजय महानंद,
हे उपस्थित होते. राजुरा तालुक्यातील विविध शाळातील विध्यार्थीनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page