Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीखांबाडा येथील पोलीस पाटलाचे पद खुल्या प्रवर्गातुन निवडा गावकऱ्यांची मागणी
spot_img

खांबाडा येथील पोलीस पाटलाचे पद खुल्या प्रवर्गातुन निवडा गावकऱ्यांची मागणी


दिवाकर भोयर धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातील मौजा खांबाळा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथील पोलीस पाटलाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात येत असल्याने ते पोलीस पाटलाचे पद रद्द करून खुल्या प्रवर्गातुन निवड करण्याची मागणी खांबाडा येथील गावकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिनांक २८/८/२०२३ ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजा खांबाळा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथील ग्रामवासीच्या वतीने मागणी करण्यात येते आहे. खांबाळा गावचे पोलीस पाटलाचे पद अनुसूचित जमाती करीता राखीव आहे. त्यानुसार आवेदन स्वीकारण्यात आले असून पुढील कार्यवाही चालू आहे.खांबाळा येथिल पोलीस पाटलाचे पद अनुसूचित जमाती करिता राखीव असल्याने गावातील बहुसंख्येने असलेल्या गैर आदिवासी जनतेवर अन्याय शासन करीत आहे.
मौजा खांबाळा हे गाव खांबाळा ग्रामपंचायत अंतर्गत असेल तरीही सदर ग्रामपंचायत अंतर्गत कोल्हारबोडी व मेंढा या गावांचा समाविष्ट आहे. सदरचे दोन्ही गावे आदिवासीच्या संख्येप्रमाणे अनुसूचित जमातीच्या उमेदवारा करता राखीव देण्यात आले आहे. हे जरी ठीक असले तरीही सदर ग्रामपंचायत च्या खांबाळा या गावात गैर आदिवासींची संख्या ५०टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत जरी पैसा अनुसूचित असली तरीही खांबाळा गावातील पोलीस पाटलाचे पद खुल्या प्रवर्गातून द्यायला पाहिजे होते.तसा ठराव ग्रामपंचायत ने सुद्धा दिनांक १२/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायतच्या ग्राम सभेत ठराव पारित करण्यात आला. परंतु प्रशासनाने सदर ठरावाकडे कानाडोळा करून खांबाला येथिल पोलीस पाटलाचे पद अनुसूचित जमाती करीता राखीव ठेवून या गावात असलेल्या बहुसंख्य गैर आदिवासी वर अन्याय केला आहे .सदर निवेदनावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून मौजा खांबाळा येथील पोलीस पाटील भरती तात्काळ रद्द करून सदर पद खुल्या प्रवर्गातून भरण्याची कृपा करावी अशी मागणी खांबाळा येथिल गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून रंजना दारसु परसा (सरपंच), मनोज मुरलीधर मोहुर्लै (उपसरपंच ),दीपक मुखरु कुमर ग्रामपंचायत (सदस्य), सुलोचना पुंडलिक गावतुरे ग्रा.पं. (सदस्य), बळीराम सिताराम कोकोडे, रविद्रं यादवराव मोहुर्ले, सुभाष मोतीराम जंगटे ,विलास यादवराव मोहुर्ले,केशरचना वाढई, लक्ष्मण पुनाजी मामेडवार, सिताराम रावजी मेश्राम, मारोती शंकर मेश्राम, वारलु मेश्राम आदी गावकऱ्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांची लोकसंख्या गैर आदिवासीची ६०ते७५टक्के पेक्षा जास्त असताना सुद्धा सरसकट पेसामधे दाखविले आहे.फक्त शासनाचे अनुदान लाट्या करीता. मात्र त्याचे परिणाम बहुसंख्य असलेल्या गावातिल लोकांना भोगावे लागत आहे.जिल्हातिल गैर आदिवासी लोकांनी करावे काय हे सरकारने सांगावे.५०%पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतिचे शासनाने ठराव मागितले. पण ते कचकुडीतच गेले असावे.मागिल निवडणूकीत 50%पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतिचे सर्वे होनार असल्याची मोठी चर्चा झाली त्यानंतर चिकार शब्दही शासनाने काढलेल्या नाही.त्यामुळे मतदारांचा विश्वास कोणावरही राहिला नाही हे मात्र सत्य.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page