Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरॲड.यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुराच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
spot_img

ॲड.यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुराच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

राजुरा 28 ऑगस्ट:-

         ॲड.यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुराच्या विद्यार्थ्यांनी वय 19 वर्षे या वयोगटातून तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटातून  प्रथम क्रमांक  दर्शना देवकुमार तिरसुले, द्वितीय क्रमांक श्रुती योगेश रायपुरे यांनी पटकविला तसेच मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक साहील सुरेश मांढरे, द्वितीय क्रमांक रजनीश सुदर्शन वांढरे, तृतीय क्रमांक बालाजी ब्रोजन मंडल, चतुर्थ क्रमांक यश नागेश गौरकार तसेच पाचवा क्रमांक जॉय अल्बर्ट अँथोनी यांनी प्राप्त केला. तसेच बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य हितेंद्र भुरले द्वितीय क्रमांक निशांत संतोष आंबटकर, तृतीय क्रमांक माहीन जावेद सय्यद, चतुर्थ क्रमांक तरंग संतोष नरड तसेच पाचवा क्रमांक जॉय अल्बर्ट अँथोनी यांनी पटकाविला तसेच मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक आकांक्षा भास्कर ढोले,द्वितीय क्रमांक लोचनी मनोहर बोरेकर तृतीय क्रमांक श्रुंगवी गणपत येंचेवाड,चतुर्थ क्रमांक  रक्षिता रवींद्र येल्ला तसेच पाचवा  क्रमांक  प्राची सुनील डोके यांनी पटकाविला असून या सर्वांची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
     विद्यार्थ्यांची ही उत्कृष्ठ कामगिरी व यशाबाबत बद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, राजुरा विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा उपाध्यक्ष ॲड.संजय धोटे, संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, संस्थेचे सदस्य मोहन धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षिका प्रा.मनिषा राखुंडे, जेष्ठ प्राध्यापक डॉ. दिनेश दुर्योधन, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अल्पना कवाडे, प्रा.इर्शाद शेख,प्रा.रेणुका देशकर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page