Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरपरेड मार्च ड्रिल, या विषयाचे क्रीडामार्गदर्शक राजबिंद्र डाहुले सन्मानित
spot_img

परेड मार्च ड्रिल, या विषयाचे क्रीडामार्गदर्शक राजबिंद्र डाहुले सन्मानित

  • क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षणा दरम्यान वेधले ” परेड मार्च ड्रिल” ने उपस्थितांचे लक्ष.

तालुका प्रतिनिधी राजुरा:- जिल्हास्तरावर 120 उच्च माध्यमिक/माध्यमिक/प्राथमिक क्रीडा शिक्षकांचे पाच दिवसाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 21 ते 25 आगस्ट 2023 या कालावधीत ‘तालुका क्रीडा संकुल’ बल्लारपूर, (विसापूर) येथे आयोजीत करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील शारीरिक शिक्षक राजबिंद्र डाहुले यांनी ‘परेड मार्च ड्रिल, या विषयाचा ‘क्रीडा मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित राहून उपस्थित क्रीडा शिक्षकांना प्रात्यक्षिक व माहिती सांगितली त्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने डाहुले यांना ‘प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर, मनोज पंधराम, तालुका क्रीडा अधिकारी बल्लारपूर, जयश्री देवकर, तालुका क्रीडा अधिकारी, कोरपना, कुंदन नायडू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, वाल्मीक खोब्रागडे, जिल्हा क्रीडा स्पर्धा संयोजक, किशोर मोहूर्ले, बल्लारपूर तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक यांची उपस्थिती होती. यावेळी डाहुले यांनी परेड मार्च ड्रिल चे महत्व, त्याचा इतिहास, शाळा स्तरावरील परेड, त्याचे आदेश आणी प्रत्यक्षिक करून दाखविले. डाहुले यांच्या सन्मानाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होतं असून ज्योतिबा शाळेतील पमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद यांनीही अभिनंदन केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page