Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरकळमना येथे वृक्षारोपणाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता
spot_img

कळमना येथे वृक्षारोपणाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता

स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम.

राजुरा (ता. प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता वृक्षारोपणाचा जागतिक कार्यक्रम राबवून सांगता करण्यात आली व त्याचबरोबर धर्मज क्रॉप गॉड कंपनी यांच्याकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कळमना येथील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व खाऊ वाटप करण्यात आले. कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी वृक्षारोपण सारखा जागतिक दर्जाच्या कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली. गाव स्वच्छ, सुंदर व हिरवगार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नाला कळमन्यातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे व त्याचबरोबर त्यांनी धर्मज क्रॉप गॉड कंपनी ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी सेवाभावी कंपनी असून ती नेहमी ग्रामीण भागातील शेतकऱ्या प्रति व शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणा करिता प्रयत्न करत असतात म्हणून कळमना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी धर्मज क्रॉप गॉड कंपनी यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना येथील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व खाऊ वाटप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यासाठी आग्रह केला. लगेचच धर्मज फाउंडेशनी होकार दिला अशा प्रकारे हा कार्यक्रम घडवून आणला.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करत असताना कळमना येथे नागरिकांच्या मदतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात मला यश आले. गाव स्वच्छ सुंदर व हिरवगार करण्याकरता व माणसं घडली पाहिजे याकरता आपला प्रयत्न आहे. धर्मज फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व खाऊ वाटप करण्यात आले मी त्याच्या कडे मागणी केली, निश्चितपणाने या मदतीने कळमना येथील विद्यार्थी घडतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे रंजना पिंगे सुनीता उमाटे ग्रामसेवक मरापे साहेब माजी पोलीस पाटील भाऊजी पाटील वाढ ई, माजी उपसरपंच महादेव ताजणे, मुख्य धापक धानकुटे सर उध्दव आसवले देवराव वाढरे धरमज फाउंडेशन वाघ साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पिपळशेडे देवाजी पाटील चापले अनिल मेश्राम महादेव आबिलकर मारोती बलकी नत्थु वडसकर महिला प्रभात संघ अध्यक्ष मिना भोयर मनिषा आबिलकर गोखरे मडम,दुधे मडम, संगिता उमाटे, लता क्षीरसागर कल्पना क्षिरसागर शांताबाई विददे, सपना मेक्षाम, व शिपाई सुनिल मेक्षाम विशाल नागोसे व समस्त गावकरी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page