Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरएम.फील.अहर्ताधरक प्राध्यापकांचे प्रस्ताव यूजीसी कडे पाठवण्याचे विद्यापीठाचे परिपत्रक निर्गमित
spot_img

एम.फील.अहर्ताधरक प्राध्यापकांचे प्रस्ताव यूजीसी कडे पाठवण्याचे विद्यापीठाचे परिपत्रक निर्गमित

  • गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश.

राजुरा 25 ऑगस्ट:-

एक जानेवारी 1994 ते 11 जुलै २००९ या कालावधीत सेवेत असताना एम.फील.पदवी अहर्ता प्राप्त अध्यापकांचे प्रस्ताव नेट- सेट मधून सूट मिळवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेकडे पाठवण्याचा संदर्भामध्ये गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशने विद्यापीठाचे कुलगुरूं मा.डॉ.प्रशांत बोकारे यांना निवेदन दिले होते व भूमिका समजाऊन सांगितली होती या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या संदर्भातजा. क्र ./ गो.वी./म.वी./1306/2023 दिनांक 24 ऑगेस्ट 20230 रोजी पत्र निर्गमित केलेले असून महाविद्यालयाकडून त्या संबंधातले प्रस्ताव मागवलेले आहे संघटनेच्या या कार्याचे मोठे यश मानले जात असून विद्यापीठ परिषेत्रातील प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत.
1जानेवारी 1994 ते 11 जुलै २००९ या कालावधीत सेवेत असताना ज्या अध्यापकांनी एम.फील. पदवी प्राप्त केली आहे व ज्यांची नियुक्ती विद्यापीठ निवड समितीद्वारे झाली आहे अशा सर्व नियमित अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी कॅश अंतर्गत पदोन्नतीचे लाभ देण्यास मंजुरी दिली आहे .
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठानेही संचलित असलेल्या महाविद्यालयातील नियमित शिक्षक ज्यांनी सेवेत असताना एम.फील.पदवी अहर्ता प्राप्त केली आहे आणि ज्यांची नियुक्ती विद्यापीठ समिती झालेली आहे अशा नियमित प्राध्यापकांना नेट -सेट मधून सूट मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठवण्याच्या संदर्भामध्ये गोंडवाना विद्यापीठ असोसिएशन सतत पाठपुरावा केलेला होता.
या पाठपुरावाला यश प्राप्त झालेले आहे. गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे व संघटनेचे सचिव व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.विवेक गोर्लावार आणि संघटनेचे सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने यांच्या शिस्त मंडळाने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांना आपली भूमिका पटवून दिली होती. संघटनेच्या या यशस्वी कार्याबद्दल गोंडवाना परी क्षेत्रातील प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून संघटनेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आणि प्रशासनाचे य आभार मानले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page