Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीनदीपात्रात आढळला नवजात बालकाचा मृतदेह
spot_img

नदीपात्रात आढळला नवजात बालकाचा मृतदेह

कैलास उईके कुरखेडा-
कूंभीटोला घाटावर सती नदीच्या पात्रात मासेमारी करणार्या बांधवाना पूर्ण विकसीत असलेल्या नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात् एकच खळबळ माजली आहे. तो नूकताच जन्माला आला असावा व अनैतिक संबधातून त्याचा जन्म झाल्याने त्याला नदीत पात्रात फेकून देण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आहे.
मृत बालक पूर्ण विकसीत असून शहरापासून १ कीलोमीटर अंतरावर असलेल्या कूंभीटोला घाटावर नदी पात्रात बेवारस पणे निर्जन स्थळी त्याला रात्रीचा सूमारास फेकण्यात आले असावे घटनेची माहीती होताच येथे बघ्यांची गर्दी झाली होती. सदर बाब कूरखेडा पोलीसांना माहीत होताच ठाणेदार संदीप पाटील यांनी घटणास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णाल कुरखेडा येथे पोहचवला मृतदेहाचा गळ्याभोवती जोड्याची लेस गूंडाळलेली आढळून आली तसेच डोक्यावर सूद्धा मार होता मृतदेहाला कीड लागत दूर्गंधी येत असल्याने दोन दिवसापूर्वीच त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे. अद्यात आरोपीने त्याचा गळा आवळत मारून फेकून दिले असावे अशी शक्यता सूद्धा नाकारता येत नाही. घटनेसंदर्भात शहरात उलट सूलट चर्चा आहे.कूरखेडा पोलीस स्टेशन येथे अदन्यात आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाला दिशा मीळणार आहे. या कड़े सर्व तालुका वासियांचा नज़र असणार आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page